श्री संत गोरोबा काका प्रवेश व्दाराचे भूमिपूजन संपन्न

विदर्भ कुंभार समाज सुधार समितीच्या प्रयत्नाला यश

अमरावती :-अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार नवनित राणा यांच्या विकासनिधीतून साकार होणारे नियोजित श्री संत गोरोबा काका प्रवेश व्दाराचे भूमिपूजन खासदारांचे प्रतिनिधी समाज सेवक सुनील राणा यांचे शुभ हस्ते श्री संत गोरोबा भवन शशीनगर बडनेरारोड अमरावती येथे कुंभार समाज बंधु-भगिनींच्या प्रचंड उपस्थितीत व शशीनगरवासी नागरिकांचे साक्षीने संपन्न झाले.            कुंभार समाजाची ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अमरावती ते बडनेरा रोडवर खासदार व आमदार विकासनिधीतून अनेक संत महंतांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रवेश व्दार साकारण्यात आलेली आहेत, त्या प्रमाणेच श्री.संत शिरोमणी गोरोबा काका स्मृतिप्रित्यर्थ देखील प्रवेश व्दार असावे, ही समाजाची प्रबळ भावना होती. श्री.संत गोरोबा भवन, शशीनगर येथे कुंभार समाजाचे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यास जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कुंभार समाज प्रतिनिधी अमरावती शहरात दाखल होत असतात, त्यांना श्री संत गोरोबा काका मंदिरात सुलभतेने पोहोचता यावे, या करीता मुख्य रस्त्यावर प्रवेश व्दार असणे आवश्यक होते. तसेच संत श्रेष्ठ श्री गोरोबा काकास स्मृतिव्दाराचे रूपाने आदरांजली अर्पण करावी व शहर सौंदर्यीकरण देखील व्हावे हे सर्व उद्देश ह्या प्रवेश व्दाराचे उभारणीतून साध्य होईल.

विदर्भ कुंभार समाज सुधार समितीकडून आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार  रवि राणा यांनी त्यांच्या भाषणात प्रवेशव्दारा करीता रू 10 लक्ष व मंदिराच्या वरच्या मजल्याच्या बांधकामास रू 25 लक्ष बांधकाम निधी जाहीर केला होता. त्यानुसार त्यापैकी प्रवेश व्दाराची पूर्तता आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून आकार घेत असल्याची भावना कुंभार समाजातून व्यक्त होत आहे.

आजच्या कार्यक्रमात सुनील राणा यांचे सोबतच युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष सचिन भेंडे, रक्तदान चळवळीचे प्रणेते  विरेंद्र उपाध्याय तसेच विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष सुधाकर शेंडोकार, समाजोन्नती समितीचे अध्यक्ष पंजाबराव काकडे, सचिव डॉ श्रीराम कोल्हे, पतसंस्थेचे अध्यक्ष भगवान जामकर, जिल्हाध्यक्ष सुनील भागवत, विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे उपाध्यक्ष अॅड गजाननराव तांबटकर, कोषाध्यक्ष सतीशराव गावंडे,सचिव सुरेंद्र सरोदे, सहसचिव मधुकर खांडेकर, प्रसिध्दी प्रमुख डॉ.विलासराव नांदुरकर, गजानन वडुरकर, विनायक तायडे,नंदकिशोर काकडे, रमेश अ.अंबुलकर, रमेश ह.अंबुलकर, विनोद मेहरे, विलास  धामणकर, गजानन काकडे, राजेंद्र भागवत, दिलीप खांडेकर, सुरेश नांदुरकर, मोहन नांदुरकर, नंदकिशोर नांदुरकर, रामेश्वर  वडुरकर, अरूण पोहनकर, रविभाऊ काकडे, सुभाष  वडुरकर, मुरलीधर चिल्लूरकर, डॉ.संजय साळविकर, राजेंद्र मांगुळकर, शंकरराव धामणकर, रूपराव खोपे, नायब तहसीलदार  अशोक  काळीवकर, कुंभविकास चे संपादक  दिगंबर इंगळे,शंकरराव गावंडे,सुनील काळकर, केशवराव मदनकर, मारोतीराव तांबट (मारोती मोटर्स) तसेच

महिला अध्यक्ष प्रभाताई भागवत, सविता कोल्हे, अर्चना खांडेकर,लता कोल्हे, निर्मला नांदुरकर,वैशाली नांदुरकर, नंदाताई पोहनकर, सुषमा काळकर,मंदा  काळे, वैशाली सरोदे, सविता काकडे,गोकर्णा कोल्हे,संगिता साळविकर, स्वातीताई साळविकर, नंदा शेंडोकार, कविता मेहरे,सुनिता  काळकर, पुष्पा मदनकर, सुनिता गावंडे,पिंकी सातव, प्रतिभा  गावंडे, मालती गावंडे,ललिता वडुरकर, सुनिता धामणकर, जया गावंडे, लता खोपे, किरण वडुरकर व कुंभार समाजातील महिला,पुरुष व स्थानिक नागरिक खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पौर्णिमा दिवसा’निमित्त प्रतापनगर चौक परिसरात जनजागृती

Wed Feb 8 , 2023
एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार व शहराचे माजी महापौर अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात मागील अनेक वर्षांपासून पौर्णिमा दिवस अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी प्रतापनगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शक माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!