नागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर या संस्थेत व्यवसाय शिल्पनिदेशकाचे यांत्रिक प्रशितन व वातानुकुलीकरण तंत्रज्ञ एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे.
संबंधित व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाची शैक्षणिक योग्यता याप्रमाणे आहेत. मेक्यानिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी उत्तीर्ण व एक वर्षांचा अनुभव किंवा मेक्यानिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका द्वीतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव किंवा यांत्रिक प्रशितन व वातानुकुलीकरण तंत्रज्ञ संबंधित व्यवसायात आय.टी.आय./एन.टी.सी. सर्टिफिकेट उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव किंवा क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम (सी. आय.टी. एस.) सर्टिफिकेट उत्तीर्ण.
शैक्षणिक अहर्तेनुसार, उपस्थित उमेदवाराची लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर येथे सर्व मूळ प्रमाणपत्र व एक झेरॉक्सच्या प्रतीसह 23 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 12 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे भिवापूर शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सी.एस. राऊत यांनी कळविले आहे.
@ फाईल फोटो