भटके विमुक्त हक्क परिषदेला भटके विमुक्त जाती जमातीचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आश्वासन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- काल सोमवार दिनांक २०/०२/२०२३ रोजी कसबा पेठ पुणे येथे भटके विमुक्त समाजाचे मूलभूत प्रश्न जाणुन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबसे यांनी महाराष्ट्रातील समस्त भटके विमुक्त समाजाचे प्रश्न मांडले ज्यामध्ये भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण करणे ,जातीच्या प्रमाणपत्रबाबत 2008 च्या जीआर चे पुनर्जीवन करणे, इंग्लिश स्कूल मध्ये समस्त भटके विमुक्त समाजाच्या मुलांना प्रवेश देणे आदी प्रश्न आपल्या भाषणात मांडले. व मुख्यमंत्री यांना त्यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक लावावी अशी विनंती केली.

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन मानण्यात आले. या सभेत दिलीप परदेशी, प्रतिक गोसावी, नागेश जाधव, शिवाजी थिटे उपस्थित होते .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com