भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 जानेवारी अर्ज करण्याचे आवाहन

 मुंबई, दि. 3 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ करिता पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या परंतू शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच भाडे तत्वावर राहत असणा-या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील प्रवेशित मुलां-मुलीप्रमाणे भोजन भत्ता, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत नियमानुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति वर्षी 60 हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शासनामार्फत जमा करण्यात येते. तरी पात्र विद्यार्थ्यांनी  स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

लसीकरणासाठी महापौरांनी वाढविला विद्यार्थ्यांचा उत्साह

Mon Jan 3 , 2022
-१५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण केंद्राला दिली भेट नागपूर, ता. ३ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महापौरांनी राजकुमार गुप्ता समाजभवन बजेरिया आणि सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कुल, सिव्हिल लाईन्स येथे भेट दिली. त्यांच्यासोबत महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!