अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- अशासकीय बालगृह, बालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

सन 2022 च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार राजेश राठोड, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, शासनाच्या बालगृहाप्रमाणे राज्यात असलेली अशासकीय बालगृह, बालकाश्रमात काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना इतर सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधनाबाबत तसेच बांधकामाचे क्षेत्रफळ तीनपट वाढीव मिळावे या आश्वासनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डेटा बेस मॅनेजमेंटच्या माध्यमातूनच विकासाचे ध्येय गाठणे शक्य

Wed Aug 30 , 2023
– जागतिक बँक चमूकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती – धोरण आणि अंमलबजवणीमध्ये सांख्यिकी माहितीचा आधार आवश्यक नागपूर :- विकासाचे अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंट सक्षम असणे आवश्यक आहे. योजना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना जिल्हास्तरावरील सांख्यिकीचा आधार घेतला जातो. त्यामुळे अद्ययावत माहिती गोळा करणारी यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यकता असून त्याआधारावरच विविध योजनांच्या अंमलबजावणी करणे सुलभ झाले असल्याची माहिती विभागीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com