मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपसचिव रोशनी कदम – पाटील, अश्विनी यमगर, चंद्रशेखर तरंगे, अवर सचिव अशोक नायकवडे, नारायण माने, भरत बिडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.