धरमपेठ ‘RRR’ केंद्राला उत्कृष्ट केंद्र पुरस्कार

– मनपातर्फे सावित्री महिला बचत गटाच्या संचालिका संघमित्रा रामटेके यांचा सत्कार

नागपूर :- केंद्र शासनाच्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय ३८ ठिकाणी रिड्युस, रियूज व रिसायकल अर्थात RRR केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांमधून धरमपेठ झोन कार्यालयातील RRR केंद्राला उत्कृष्ट ‘RRR’ केंद्र पुरस्कार जागतिक पर्यावरण दिना निमित्त़ प्रदान करण्यात आला. धरमपेठ झोन कार्यालय येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त तथा समाज विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे यांच्याहस्ते धरमपेठ ‘RRR’ केंद्र प्रमुख व सावित्री महिला बचत गटाच्या संचालिका संघमित्रा रामटेके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबिवली.

याप्रसंगी कार्यकारी मनपाचे अभियंता विजय गुरुबक्षाणी…. यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी व सावित्री महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. RRR केंद्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून, नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी असलेले साहित्य जुने कपडे, पुस्तके, बॅग, खेळणी, प्लॅस्टिक आदी वस्तू ‘RRR’ केंद्रामध्ये जमा केल्या आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पं. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गट स्थापित करण्यात आले आहेत. नागपूर शहराला स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी थ्री R रिड्युस, रियूज व रिसायकल वर भर देत बचत गटांच्या माध्यमातून हे RRR केंद्र चालविण्यात येत होते. यातील धरमपेठ झोन कार्यालयातील RRR केंद्र हे सावित्री महिला बचत गटामार्फत चालविल्या जात आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यबदल यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CIL Chairman Pramod Agarwal reviews WCL

Fri Jun 9 , 2023
Nagpur :- Pramod Agarwal, Chairman, Coal India Limited reviewed production, productivity and future plans of the company during the review meeting he held on June 8, 2023 at the WCL headquarters in Nagpur. In the review meeting, he appreciated the work culture and speedy execution of tasks by WCL team. In his address, he emphasized the significance of the second […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com