बरडे लेआउट बोरगाव येथे मनपा नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे बरडे लेआउट बोरगाव येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आज दिनांक 13 /09 / 2023 ला नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या हस्ते पार पडले.

मोफत असलेल्या आरोग्य केंद्राचा नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व वैद्यकीय चिकित्सक व चमूने पूर्ण तन्मनाने सेवा द्यावी असे मार्गदर्शन डॉ. बहिरवार यांनी याप्रसंगी केले. प्रमुख अतिथि म्हणून मंगळवारी झोनचे सहा. आयुक्त डॉ अजय कुरवाडे, सहा, आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता गौरीष वासनीक, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान, कनिष्ठ अभियंता दिपक जांभूळकर, प्र. सहा अधिक्षक श्री अजय परसतवार, डॉ. शहबाज, डॉ. संकेत तसेच कर्मचारी व नागरीक मोठ्या प्रमाणात याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यकमाचे संचलन केंद्र समन्वयक पुरुषोत्तम कळमकर यांनी केले तर आभार डॉ. संकेत यांनी व्यक्त केले.

NewsToday24x7

Next Post

सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची

Thu Sep 14 , 2023
मुंबई :- अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत . उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com