प्रधानमंत्र्यांच्याहस्ते 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण

Ø 88 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता व महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. यायोजनेंतर्गत राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

यवतमाळ येथे पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा 1943.46 कोटीचा लाभ राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील 85.60 लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम 1712 कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या दिनांक 28 फेब्रुवारी यवतमाळ येथे प्रधानमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात येणार आहे. राज्याच्या योजनेमधून जवळपास 3800 कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.

पीएम किसान योजनेचे 2 हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळून 4 हजार असा एकुण 6 हजार रुपयांचा लाभ यवतमाळ येथून राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. केंद्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्रे, सामाईक सुविधा केंद्रे या ठिकाणी पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागस्तरीय पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Mon Feb 26 , 2024
यवतमाळ :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालयाच्यावतीने दि.1 मार्चला अणे महाविद्यालयात विभागस्तरीय पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात रतन असोसिएट्स, युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर, अलाईड रिसोर्सेस मॅनेजमेंट सर्वीस इंडिया प्रा.लि, पीपीएस एनर्जी सोल्युशन, संसुर सृष्टी इंडिया प्रा.लि, धुत ट्रान्समिशन, विनय ॲटोमोबाईल, इंदुजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com