युनियन बॅंक कांद्री येथे अज्ञात आरोपीने १,२०,५२१ रूपये काढुन केली फसवणुक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किमी अंतरा वरील युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे अज्ञात आरोपी ने फिर्यादी च्या पत्त्नी च्या खात्यातुन १,२०,५२१ रुपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२) जुलै ते गुरु वार (दि.१४) जुलै ला दुपारी १२ ते १२.३० वाजता च्या दरम्यान राजेंद्र बालाजी वानखेडे वय ५६ वर्ष राह. धर्मराज शाळा समोर वार्ड क्र. ७ कांद्री कन्हान यांची पत्नी हि युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे गेली. तेव्हा समजले कि अज्ञात आरोपी ने तिचे व तिच्या पतीच्या खात्यातुन अँझान पेटीएम गुगल या एप्स द्वारे एकुण १,२०,५२१ रूपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी राजेंद्र बालाजी वानखेडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पावसाची चाहूल देणारा ‘मृग कीटक’(बिलबाबोटी) झाला दुर्मिळ

Mon Jul 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 18:- एरवी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मृग किड्याचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले आहे. हे किडे फारसे दिसत नाहीत, असे निरीक्षण अनेक शेतकऱ्यांनी नोंदवले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक कीटकांची गर्दी रानावनात दिसते; परंतु मृगाचा किडा या सर्वांहून आगळावेगळा दिसतो. तो शेतजमिनीला हानीकारक उपद्रवी कीटकांचा फडशा पाडतो. यामुळे जमीन पिके पेरणीनंतर आलेल्या कोंबाचे रक्षण होते. जमिनीसाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com