कन्झुमर नाही तर प्रोड्युसर बना – आमदार जयस्वाल

– पंचाळा येथील माझी माती माझा देश अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात आमदार जयस्वाल यांचे उद्गार

– पंचाळा येथे माझी माती माझा देश अभियानाचा समारोप

– जिल्हाधिकाऱ्यांसह सी इ ओ ची हजेरी

रामटेक :- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत माझी माती माझा देश हे अभियान जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत शितलवाडी येथून झाली तर समारोप ग्रामपंचायत पंचाळा येथे नुकताच १४ ऑगस्टला झाला. या समारोपीय कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांनी पंचाळा वासीयांना ‘ कन्झ्युमर नाही तर प्रोड्युसर बना ‘ असा सल्ला दिला. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी विपिन इटनकर जिल्हा परिषद च्या सीईओ सौम्या शर्मा , वनविभागाचे भारत हाडा, आर्मी कर्नल जोशी हे उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवर तथा अधिकारी यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा नृत्याचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ सौम्या शर्मा यांनी केले त्यात त्यांनी पंचाळा येथील माती नवी दिल्ली ला जाणार असुन हर घर तिरंगा मोहीम आवर्जून राबवा असे उपस्थितांना संबोधन करीत सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी शासनाच्या विविध योजना, माझी माती माझा देश अभियानाचे महत्त्व सांगत रामटेक पंचायत समीती यंत्रणेने ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान माझी माती माझा देश हे अभियान यशस्वीरित्या राबविले असल्याचे सांगीतले. कार्यक्रमात आदिवासी प्राविण्य प्राप्त १० वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. संचालन तथा आभार पंचाळा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी पवन उईके यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा परीषद सदस्य संजय झाडे, शांता कुमरे, सतीश डोंगरे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव , पं.स. उपसभापती नरेंद्र बंधाटे, ठाणेदार हृदयनारायण यादव, आर.एफ.ओ. अनील भगत सरपंच प्रगती माटे यांचेसह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

कन्झुमर नाही तर प्रोड्युसर बना – आमदार जयस्वाल

समारोपीय कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना सांगितले की, आपण आपल्या देशासाठी काय केलं याचा आधी विचार करावा. पंचाळावासीयांनी गावामध्ये उत्पादन वाढवलं पाहिजे, कन्झुमर नाही तर प्रोड्युसर झाले पाहिजे. बचत गटांचा विकास करायचा आहे. आपले गाव समृद्ध कसे होईल याचा विचार करा. यानंतर आमदार जयस्वाल यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत नागरिकांचा सर्वतोपरी विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून अधिकारी कर्मचाऱ्यांनी म्हणजेच प्रशासकीय यंत्रणेने जबाबदारीने कार्य करावे असे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंगलवारी ज़ोन 'राम भरोसे',आयुक्त का जोन की ओर ध्यान नहीं 

Fri Aug 18 , 2023
– वार्ड अधिकारी से लेकर स्वास्थ्य विभाग मदमस्त  नागपूर :- किसी भी मामले में मंगलवारी जोन के किसी भी विभाग के किसी भी अधिकारी/कर्मी को उनके अधीनस्त काम बताए तो एक ही जवाब ‘आदमी कम है,सामान नहीं है,…… कर देंगे या हो जायेगा। लेकिन शिकायतकर्ता रूपी जोन अंतर्गत रहने वाले नागरिकों का कोई वाली नहीं। क्षेत्र की साफ़-सफाई का हाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com