– जन गण मन पदयात्रेला सुरुवात
नागपूर :- दिनांक 23/08/2023 ला राष्ट्रीय युवक काँग्रेस चे महासचिव बंटी बाबा शेळके यांच्या सहकार्याने आणि बारसे नगर येथील रहिवाश्यांच्या नेतृत्वात नागपुर चे जिल्हाधिकारी यांना बारसे नगर येथे मालकी हक्क पट्टे मिळून देण्याबाबत विनंती अर्ज देण्यात आला.
20 ऑगस्ट पासून मध्य नागपुर विधानसभा शेत्रात बंटी बाबा शेळके व मध्य नागपुर काँग्रेस कमिटी च्या माध्यमातन जन गण मन 90 दिवसांची पदयत्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रे ची सुरुवात बारसे नगर भिम ज्योती बुद्ध विहार येथून करण्यात आली.
जन गण मन पदयात्रेचा उद्देश मध्य नागपुर मधील विविध एरियातील लोकांच्या मूलभूत समस्या जाणून घेणे, जणते सोबत सरळ संवाद करणे जेणेकरून त्यांच्या समस्यांची तीव्रता आणि त्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या हे समजणे सोपे होईल. त्यामुळे जनता आणि लोकप्रतिनिधी मध्ये सुसंवाद साधला जाईल.
याच जन गण मन पदयात्रेत बारसे नगर मधील जनतेच्या समस्या सोडवत असताना बारसे नगर मधील रहिवाश्यांनी बंटी बाबा शेळके यांना त्यांच्या मालकी हक्क पट्टे बाबत समस्याचे निराकरण करण्यास विनंती केली. त्यांनी सांगितले की मागील 8 वर्षा पासन बारसे नगर येथील रहिवाशी पट्टे प्राप्त करण्याकरिता लढत आहे परंतु प्रशासनाच्या हलगर्जी पणा मुळे आणि दिरंगाई मुळे त्यांना त्यांच्या हक्का पसन वंचित ठेवण्यात येत आहे. रहिवाश्यांना प्रशासन एका ऑफिस मधून दुसरी कडे व दुसऱ्या ऑफिस मधून तिसरी कडे फेऱ्या करवल्या जात आहे. परंतु प्रशासनाच्या या नाकारते पना मुळे बारसे नगर येथील रहिवाशी आणि तेथील विद्यार्थांच्या भविष्यावर टांगती तलवार कायम ठेवत आहे.
म्हणून आज बंटी बाबा शेळके आणि बारसे नगर येथील रहिवाश्यानी प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती अर्ज देऊन एक निर्वाणी चा इशारा दिला आहे. लवकरात लवकर या बाबत योग्य निर्णय न घेतल्यास जनतेच्या असंतोषास समोर जावे लागेल.
आज सोबत श्रीकांत ढोलके, राष्ट्रीय युवक काँग्रेस चे महासचिव बंटी बाबा शेळके, नागपूर शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष तोसीफ खान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव आकाश गुजर, शंकर रंदीवे,प्रकाश लायसे,स्वप्निल ढोके,धैर्यशील ढेंग्रे,नयन तरवटकर,सागर चव्हाण,कुणाल खड़गी, बारसे नगर येथील रहिवाशी प्रकाश इंदुरकर, कमला लांजेवार, सुनीता पडोळे, प्रिय वानखेडे, सुनीता नेवणे, अनिल गेडाम, मनोज मेश्राम आदि पदाधिकारी व बारसे नगर येथिल जागरूक नागरिक उपस्थित होते.