बंगला चौकाचे होत आहे विदृपीकरण

सौंदर्यकरण व रुंदिकारण प्रस्तावाला अद्यापही मंजूरी नाही – पडोले

कोदामेंढी :- रामर्टेक -खात -भंडारा मार्गावरील नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौदा तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध कोदामेंढी चे प्रवेश द्वाराची सुरुवात असलेल्या बंगला चौकात चारही दिशेने जाणारे येणारे प्रत्येक वाहन साठ सत्तर च्या गतिने सुसाठ वेगाने धावून येतात.त्यामुळे येथे नेहमी अपघात होतात. अपघातामुळे काही थोड़क्यात बचावले, काहीन्ना अपंगत्व आले तर काही दगावले. त्यामुळे हा बंगला चौक “डेंजर चौक म्हणून नविन ओळख निर्माण करत आहे. या चौकाच्या प्रलंबीत सौंदर्यकरण व रुन्दीकरणच्या प्रस्तावाला अजूनही मंजूरी न मिळाल्याने सध्या या चौकाचे विदृपीकरण सुरु आहे.

मागील अडीच वर्षापूर्वी दोनशे बावन कोटी खर्च करून घोटिटोक ते खात भंडारा मार्गाचे सीमेंटिकरण करण्यात आले.या मार्गावरील मसला, अरोली, इंद्रपुरी, इजनी, धर्मापुरी, खात, सातोना, टवेपार, खुर्सीपार, आदि गावासह भंडारा येथे मार्गावर दुभाजक आणि हायमास्ट लाइट लावून सुशोभिकरण करण्यात आले वाटेत या गावाचे दर्शन झाल्यास जणू एखाद्या शहरात आल्यासाराखे वाटते. या मार्गावरील सर्वात मोठा चौक म्हणजे “डेंजर चौक” येथून 100 मीटर अंतरावर उत्तरेस कोदमेंढी आणि दक्षिनेस नांदगाव आहे..अडीच वर्षाचा कालावधी लोटूनही या चौकाचे चौड़ीकरण,सौंदर्यकरण, हायमास्ट लाइट चे काम अजूनही प्रलंबित असून या चौकाची वाटचाल विदृपीकरणाकड़े सुरु असल्याचे चित्र आहे. यबाबत भ्रमनध्वनिवरुन नंदगाव चे जनतेतून पाच महिन्यापूर्वी निवाडून आलेले सरपंच अनिल पडोले यांना विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले कि,मी सरपंच होण्यापूर्वी येथील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्हातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेतेमंडलीन्नी संबंधित विभागाकड़े प्रस्ताव पाठवले आहेत, मात्र मंजूरी प्रलंबित असल्याने कामाला सुरुवात झाली नाही.

या डेंजर चौकत आणखी दोन, चार डेंजर अपघात घड़न्याची वाट सम्बंधित प्रशासन विभाग पहात आहे का ? असा सवाल पत्रकार संदीप गौरखड़े सह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व या डेंजर चौकाच्या नावाने भयभीत असलेल्या परिसरातील नागरिकान्नि शासना समोर मांडला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मौदा उपविभागात 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती

Fri May 5 , 2023
– वेब-बेस्ड ऑनलाईन अर्जास स्विृकती नागपूर :- जिल्ह्यातील मौदा उपविभागातील मौदा व कामठी तालुक्यातील गावातील 145 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 17 मे पर्यंत मागविण्यात आले आहे. सरळ भर्ती प्रक्रियेत अनुसूचित जाती-25, अनुसूचित जमाती -13, विशेष मागास प्रवर्ग-4 विमुक्त जाती व भटक्या जमाती- 21, इतर मागास प्रवर्ग-33 आणि खुल्या प्रवर्गासाठी 34, आर्थिक दुर्बल घटक-15 असे एकूण 145 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com