पाणी नाही तर मतदान नाही, रमाई नगरातील नागरिकांचा इशारा, सहायक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागरी समस्या बाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे रमाई नगरातील नागरिकांनी मतदाना वर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले आहे.

प्रभाग 15 तील रमाई नगरात अनेक वर्षापासुन मुलभुत सोईंचा अभाव आहे, तसेच येथील जवळपास 60-70 घरांना पाणी पुरवठा होत नाही, स्थानिक भाजपा नगरसेविका संध्या रायबोले यांनी न प प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले स्थानिक नागरिकांनी देखील पाण्याच्या गंभीर समस्या बाबत संबधितांना लेखी तक्रारी केल्या पण तक्रारी निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली असा आरोप स्थानिक रहिवासी ऋषि दहाट, शंकर चवरे, रतन रंगारी, अनिल शेंडे, मनोज वासनिक यांनी केला आहे.

गत 15 दिवसात भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, ऋषि दहाट, शंकर चवरे, रतन रंगारी यांच्या सह महिलांनी नगर परिषद प्रशासना विरोधात हंडा मोर्चा, माठ फोड़ो, थाली नाद आंदोलन केली पण न प प्रशासनाने दखल घेतली नाही शेवटी स्थानिक 50 नागरिकांच्या स्वाक्षरी चे निवेदन 09-रामटेक लोकसभा क्षेत्र चे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांना सोमवारी भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले यांनी सोपविले आणि रमाई नगरातील नागरिकांचा लोकसभा मतदान वर बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट केले, निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ड्रैगन पैलेस टेंपल भेटी दरम्यान देण्यात आली तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, आमदार टेकचंद सावरकर यांना मेल करण्यात आली.

– पाच वर्षा पूर्वी अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत पाईपलाईन मंजूर झाली असून संबधित विभागाची मंजूरी देखील झाली आहे, परंतु नगर परिषद प्रशासना च्या दुर्लक्षा मुळे फाइल पाणी पूरवठा विभागात अड़गळीत पडली आहे. न प प्रशासनाने नागरिकांना पाण्या सारख्या मुलभुत समस्या वर तातडीने निर्णय घ्यावा आणि लोकशाही तील निवडणुकीच्या महाकुंभात स्थानिक नागरिकांचा सहभाग निश्चित करावा

– संध्या रायबोले, माजी नगरसेविका

पाणी पुरवठा अभियंता अवी चौधरी

– यासंदर्भात पाणी पुरवठा अभियंता अवी चौधरी यांनी सांगितले की नगर परिषद तर्फे तातडीने उपाययोजना करून समस्या मार्गी लावण्याहेतू पाणी पूरवठा साहित्य पोहोचविले असून उद्यापासून खोदकामे सुरू करुन तातडीने समस्या मार्गी लावण्यात येईल..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा - सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला काँग्रेसचा खरपूस समाचार

Tue Apr 16 , 2024
– घुग्गुस येथील जाहीर सभेला उसळली रेकॉर्डब्रेक गर्दी चंद्रपूर :- “काँग्रेस हे जळते घर आहे, असे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे कार्य काँग्रेसला कधीच जमले नाही. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर काँग्रेसने दोनवेळा त्यांचा पराभवही केला. त्यामुळे बाबासाहेबांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसचा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पराभव करा आणि त्यांना धडा शिकवा”, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com