संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रामटेक लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल ला होणार आहे.तर 4 जून ला मतमोजणी होणार आहे.ही निवडणूक खुल्या ,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी उद्या 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून मतदानाच्या दिवशी 19 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण दिवस रामटेक लोकसभा मतदार संघातील पूर्ण विधानसभा मतदार संघात तसेच कामठी तालुक्यातील ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्यविक्री करण्यास मनाई राहणार असून 4 जून मतमोजणी च्या दिवशी सुद्धा मद्यविक्रीस बंदी राहणार असून या दिवशी कोरडा दिवस ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जारी केले आहे.या आदेशाचे उल्लंघन कारणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
– फाईल फोटो