अनधिकृत उत्खननावर प्रतिबंधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नागपूर, दि. २७ : राज्यातील गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खननावर प्रतिबंध यावा, यासाठी १५ जानेवारी पर्यंत नवीन धोरण आणले जाणार आहे. या नवीन धोरणात ड्रोन कॅमेरा, सीसीटिव्ही या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात अनधिकृत खडीक्रशर धारकांकडून अवैध उत्खनन प्रकरणी प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली होती, यास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तरात दिले.

कर्जत तालुक्यात झालेल्या अवैध उत्खनन प्रकरणी संबधित खडीक्रशर धारकांकडून ४८ कोटी १९ लाख ६८ हजार ५२५ रुपयांची दंडात्मक रकमेची कार्यवाही करण्यात आली असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या अवैध उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीवरील चर्चेत विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घाटकोपर पोलीस वसाहतीच्या जागेवर अनियमितता झाली असल्यास कारवाई करणार - उद्योगमंत्री उदय सामंत

Tue Dec 27 , 2022
नागपूर, दि. २७ : घाटकोपर येथे पोलीस वसहतीसाठी भूखंड आरक्षित असून या भूखंडावर अनियमितता झाली असल्यास याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. घाटकोपर पोलीस वसाहतीच्या राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत पेट्रोल पंप उभारल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की,घाटकोपर येथील भूखंडावर बृहन्मुंबई विकास योजना २०३४ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com