रावणवाडी पोलिस स्टेशनची दुरवस्था; अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमीच अनुचित घटनेची भीती.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

प्लस्टिकची ताडपत्री टाकून सुरु आहे पोलीस स्टेशनचे कामकाज

लोकांची सुरक्षा करणारेच असुरक्षित!

गोंदिया – प्रत्येक परिस्थितीत जनतेला सुविधा देणारे पोलीस स्वत: लाचार आहेत. जनतेला प्रत्येक परिस्थितीत सोयीसुविधा देणाऱ्या पोलीस ठाण्याची सध्या भीषण परिस्थिती आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याची इमारत जर्जर झाली असुन त्यातुन पावसाचे पाणी गळत आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व  कर्मचाऱ्यांना अनुचित प्रकार घडण्याची भीती कायम असते. यामुळे ठाणेच असुरक्षित झाले असून पाण्यापासून बचावासाठी पोलिसांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून छतावर प्लास्टिक टाकली आहे.

 

रावनवाडी पोलिस स्टेशनची इमारत ३० ते ४० वर्ष जुनी असुन या २०१० पासुन या इमारतीत ठाण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आले. तर या इमारतीत ५० अधिकारी कर्मचारी आपले कर्त्यव्य बजावत आहेत. या ठाण्याला सुमारे ५५ गावांची जबाबदारी असुन विविध घटनांना घेउन जनता ठाण्यात येतात. रावणवाडी नवीन पोलिस स्टेशनच काम मागिल 3 वर्षा पासून संत गतीने सुरू आहे. मात्र पोलिसांना जर्जर इमारतीत काम करावा लागत असल्याने अनुचित घटनेची शक्यता टाळता येत नाही. एकादी अनुचित घटना घडल्यावर प्रशासन जागा होणार का अशा प्रश्न पडला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ओबीसींसाठी ३५ जागांचे आरक्षण जाहीर

Sun Jul 31 , 2022
महिलांसाठी १८ जागा निश्चित ; सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ३८ जागा नागपूर –  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागातील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी १८ जागा आरक्षित करण्यात आल्या असून सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ३८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ३१ मे रोजी ओबीसींचा अपवाद वगळता आरक्षण काढण्यात आले होते. त्यात सर्वसाधारण प्रवर्गात ५६ जागा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com