वाढत्या महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडी चे निवेदन

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 6:- सध्या सतत होत असलेल्या पेट्रोल, डिझेल ची भाववाढ व रसोई गँस ची झालेली भरसाट भाववाढ ही सर्वसामान्य कुटुंबियांचे कंबरडे मोडणारे असून या महागाई मुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे यासाठी या वाढत्या महागाई विरोधात आज कामठी तहसील कार्यालयात वंचित बहुजन आघाडी कामठी च्या वतीने निषेध नोंदवून नायब तहसिलदार यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे नरेश वाघमारे, प्रशांत नगरकर , सी.सी. वासे दिपक वासनिक ,राजेश ढोके , अविनाश गजभिये, अजय मेश्राम, प्रणय फुले , कैलास मुळे, उमेश सुखदेवे,सुमेध गेडाम, क्रुपाशंकर ढोके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कढोलीत 5 ब्रास अवैध वाळू जप्त

Wed Apr 6 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 5:- स्थानिक कढोली गाव मार्गे विना रॉयल्टी अवैधरित्या विना परवाना ट्रक क्र एम एच 36 ए ए 3445 ने वाळू वाहून नेत असता रात्रगस्तीवर असलेल्या महसूल पथकाने सदर ट्रकवर धाड घालून अवैधरित्या वाहून नेणारे 5 ब्रास वाळू जप्त करीत पुढील कायदेशिर कारवाहिस्त्व ट्रक मौदा पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.तसेच वारेगाव शिवारात बोलेरो क्र एम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights