अमरदिप बडगे, प्रतिनिधी
प्लस्टिकची ताडपत्री टाकून सुरु आहे पोलीस स्टेशनचे कामकाज
लोकांची सुरक्षा करणारेच असुरक्षित!
गोंदिया – प्रत्येक परिस्थितीत जनतेला सुविधा देणारे पोलीस स्वत: लाचार आहेत. जनतेला प्रत्येक परिस्थितीत सोयीसुविधा देणाऱ्या पोलीस ठाण्याची सध्या भीषण परिस्थिती आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याची इमारत जर्जर झाली असुन त्यातुन पावसाचे पाणी गळत आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुचित प्रकार घडण्याची भीती कायम असते. यामुळे ठाणेच असुरक्षित झाले असून पाण्यापासून बचावासाठी पोलिसांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून छतावर प्लास्टिक टाकली आहे.
रावनवाडी पोलिस स्टेशनची इमारत ३० ते ४० वर्ष जुनी असुन या २०१० पासुन या इमारतीत ठाण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आले. तर या इमारतीत ५० अधिकारी कर्मचारी आपले कर्त्यव्य बजावत आहेत. या ठाण्याला सुमारे ५५ गावांची जबाबदारी असुन विविध घटनांना घेउन जनता ठाण्यात येतात. रावणवाडी नवीन पोलिस स्टेशनच काम मागिल 3 वर्षा पासून संत गतीने सुरू आहे. मात्र पोलिसांना जर्जर इमारतीत काम करावा लागत असल्याने अनुचित घटनेची शक्यता टाळता येत नाही. एकादी अनुचित घटना घडल्यावर प्रशासन जागा होणार का अशा प्रश्न पडला आहे.