बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे नातू पंजाबमधून मैदानात – चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली :- वडिल यशवंत आंबेडकर यांच्या पराभवाचा हिशेब बरोबर करण्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर पंजाबच्या होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 1962 मध्ये याच मतदारसंघातून वडिल यशवंत आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. तेव्हा ते पराभूत झाले होते.

लोकसभेची निवडणूक आता सातव्या अर्थात शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. यात पंजाबमधील 13 जागांसह देशातील 57 जागांवर निवडणूक होत आहे. येत्या शनिवारी 1 जून रोजी मतदान होणे आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन नातवंडांनी लोकसभेच्या निवडणुकीत उडी मारली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून निवडणूक लढले.

आता भीमराव यशवंत आंबेडकर हे पंजाबच्या होशियारपूरमधून निवडणूक लढत आहेत. हा मतदारसंघ अनुसचित जातीसाठी राखीव आहे. भीमराव आंबेडकर यांनी होशियारपूरमधून लढावे असा आग्रह धरला होता. जनतेच्या भावना लक्षात घेता भीमराव आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एस.के.भंडारी यांनी ‘पुण्यनगरी’शी बोलताना दिली.

ग्लोबल रिपब्लिकन पार्टीच्यावतीने ते निवडणुकीच्या मैदानात असून गॅस—सिलेंडर त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. याशिवाय भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन नातू लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यापाठोपाठ भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकरांनीही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तिन्ही भावंडांनी एकाच निवडणुकीत लढण्याची ही पहिलीच वेळ होय.

भिमराव यशवंत आंबेडकर यांनी ग्लोबल रिपब्लिकन पार्टीतून पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यात एक जूनला मतदान होणार आहे.

भाजपने होशियारपूर मतदारसंघातून अनिता सोम प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. आपने राजकुमार चब्बेवाल आणि काँग्रेसने यामिनी गोमर, शिरोमणी अकाली दलाकडून सोहन सिंह ठंडल आणि बसपाने रणजीत कुमार यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

होशियाररूपमधील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे भिमराव आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. होशियारपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रातून निधी आणला जाईल, असेही ते म्हणाले.

होशियारपूर लोकसभा मतदारसंघात 14 लाख 85 हजार 286 मतदार आहेत. यात सात लाख 62 हजार पुरूष आणि सात लाख 23 हजार महिला आहेत. 2014 मध्ये 9 लाख 61 हजार 297 मते पडली होती. होशियारपूरमध्ये गुरदासपुर आणि कपूरथला जिल्हचा समावेश होतो.

भीमराव आंबेडकर यांचे वडिल यशवंत आंबेडकर यांनी 1962 मध्ये होशियारपूरमधून निवडणूक लढविली होती. तेव्हा 10 हजार मताने त्यांचा

पराभव झाला होता. यानंतर 1996 मध्ये बसपा सुप्रिमो कांशीराम यांनी होशियारपूरमधून निवडणूक लढविली आणि कॉग्रेसच्या उमेदवाराचा 10 हजारापेक्षा जास्त मताच्या फरकाने पराभव केला होता.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 २५ वर्षांनी दिला शाळेत जगलेल्या दिवसांना उजाळा

Wed May 29 , 2024
चंद्रपूर :- छोटुभाई पटेल हायस्कुल चंद्रपूर येथील वर्ष १९९९ मधिल १० वि च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रविवार दि. २६ मे ला ” दिवस शाळेचे… क्षण रौप्य महोत्सवाचे “‘हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट शाळेत जगलेल्या दिवसांना पुन्हा उजाळा देण्याचा होता. शाळेतील ते सोनेरी दिवस, आठवणीतील क्षणांना परत उजाळा देण्यात आला. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांंनी शाळेत हजेरी लावली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!