जिल्ह्यातील तीन उद्योकांना उद्योग पुरस्कार प्रदान

नागपूर :- सन – 2022 वर्षासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव करीत प्रथम पुरस्काराचे मानकरी म्हणून शुभलक्ष्मी फूडस् इंडस्ट्री यांची निवड करण्यात आली असून द्वितीय पुरस्कार ब्रम्हाणी इंडस्ट्रीज आणि डॅफोडिल्स एनग्रेवर्स इंडिया प्रायव्हेट ‍लिमीटेड यांना विभागून देण्यात आला आहे.

लघु उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी संपादन केलेल्या यशाची साभार पोच द्यावी, या हेतूने राज्य शासनाचे जिल्हा पातळीवर जिल्हा पुरस्कार योजना सुरु केली आहे. प्रथम पुरस्कारप्राप्त उद्योजकास 15 हजार रुपये, गौरव चिन्ह व द्वितीय पुरस्कार 10 हजार, गौरव चिन्ह देवून पुरस्कारीत करण्यात येते.

पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड, विकासाचा वेग, तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन विकास व गुणवत्ता नियंत्रण, आयात, निर्यात, उत्पादनातील बदल, व्यावस्थापन आदि निकषावर केली जाते.

NewsToday24x7

Next Post

Walk through the Woods- the Waldorf Way

Sat Feb 3 , 2024
Nagpur :- All of nature begins to whisper its secrets to us through its sounds. On the beautiful morning of 11th of January, 2024, the students of Grade I and II from the Nagpur Waldorf Inspired School (NWIS), along with their Class Teachers,  Asha Shambharkar (Grade II) and Alpa Pilley (Grade I) were excited to walk the trail along the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com