रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. मनिष व्दिवेदी हे काटोल, सावनेर व हिंगणा या विधानसभा मतदारसंघाचे व अनुनय भाटी हे उमरेड, कामठी व रामटेक या विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक असतील.

मनिष व्दिवेदी यांचा मोबाईल क्रमांक 8263897469 असा आहे. अनुनय भाटी यांचा मोबाईल क्रमांक 9579522120 असा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च निरीक्षणासाठी आलेले निवडणूक खर्च निरीक्षक अनुनय भाटी व मनिष व्दिवेदी यांची निवासाची व्यवस्था रवि भवन येथील अनुक्रमे कॉटेज क्रमांक 7 व 8 येथे करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे खर्च लेखा तपासणी 5, 10 व 16 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात येणार आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवाराची, नागरिकाची किंवा मतदारांची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चर्चित रेत माफिया बना कांग्रेस से लोकसभा उम्मीदवार?

Sat Mar 30 , 2024
– इतने बुरे दिन आ गए जिला कांग्रेस और उसके समर्थकों के ; हो भी क्यों न जब !  – रेत में लिप्त तथा धोखाधड़ी जैसे मामले दर्ज हैं..! नागपुर – कांग्रेस जैसी पार्टी में उम्मीदवारों का तोटा, हो भी न क्यों, क्यूंकि अब देश में सिमित रह गई कांग्रेस तो रेत माफिया जैसों के नाम की सिफारिश पर प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights