संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलावर मध्यप्रदेश शिवणी कडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने कामठी कडे येणाऱ्या तीन चाकी ऑटो ला दिलेल्या जबर धडकेत घडलेल्या भीषण अपघातात ऑटो चालकासह ऑटो मध्ये बसलेले आठ सैन्य जवान प्रवासी गंभीररित्या जख्मि झाले होते .यातील दोन अपघाती जख्मि सैनिकांपैकी विघ्नेश व धीरज रॉय या दोन सॅनिकांचा उपचारादरम्यान काल रात्री 9 दरम्यान दुर्दुवी मृत्यू झाला असून आज मेडिकल ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेला ऑटो चालक शंकर विठ्ठलाल खरबाण रा गोरा बाजार कामठीचा आज मृत्यू झाला. तसेच उर्वरित सहा जख्मि सैनिक तीन वेगवेगळ्या इस्पितळात उपचारार्थ दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहेत.ही घटना काल रविवारी सायंकाळीं 5 दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी येथील गार्ड रेजिमेंटल सेंटर येथे कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे 15 सैनिक हे रविवार हा आठवडी सुट्टीचा दिवस असल्याने सुट्टी घालविण्यासाठी बाहेरगावी जाऊन काल रविवारी सायंकाळी 5 दरम्यान कामठी कडे दोन ऑटोने प्रवास करीत येत असता कन्हान नदी पूलावर अनियंत्रित ट्रॅव्हल्स क्र एम एच 31 एफ सी 4158 च्या चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या तीन चाकी ऑटो क्र एम एच 49 ए आर 7433 ला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या भीषण अपघातात सदर ऑटो मध्ये बसलेले आठ ही सैन्य जवान प्रवासी गंभीर जख्मि झाले होते.त्यातील दोन सैनिक उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडले .
उपचार घेत असलेल्या सहा जख्मि सैनिकांत कुमार पी ,शेखर जाधव,मुरजम,अरविंद,नागारत्नम,,बी प्रधान चा समावेश आहे पोलिसांनी सदर घटनेची नोंद करीत आरोपी ट्रॅव्हल्स चालक मधुकर विठ्ठलराव काळे वय 60 वर्षे विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.