नवीन कामठी पोलिसांनी दिले सहा गोवंश जनावरांना जीवनदान.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 11 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी मार्गे एका वाहनाद्वारे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून नागपूर जबलपूर च्या सर्व्हिस रोड वर असलेल्या एच पी पेट्रोलपंप जवळ नेरी गाव मार्गेहुन एका चार चाकी कारने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहुन नेत असता पोलिसांनी सदर वाहनावर त्वरित धाड घातली असता आरोपीने संधी साधून घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले तर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन वाहनातील सहा गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जात असलेल्या सहा गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज पहाटे साडे पाच दरम्यान केली.

या धाडीतून अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असलेले चार चाकी कार क्र एम एच 40 डब्लू 1562 किमती 5 लक्ष रुपये व सहा गायी किमती 90 हजार रुपये असा एकूण 5 लक्ष 90 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत पसार आरोपी विरुद्ध प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 चे कलम 11(1)(घ)(ड)(च)सहकलम 5 (ब)9,9(अ)सहकलम मोटर वाहन अधिनियम 1988 कलम 83, 177 मोटर वाहन कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेड्यात जुन्या वैमनस्यातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला..

Thu Aug 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 11 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुन्या वैमनस्यातून आरोपीने जखमीच्या घरासमोर उभे राहून जख्मि तरुणाच्या डोक्यावर, मानेवर, डाव्या हाताच्या मनगटावर व उजव्या हाताच्या पंज्यावर चाकूने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून गंभीर जख्मिचे नाव किसना सुधाकर तूपट वय 40 वर्षे रा येरखेडा तर आरोपीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com