रामटेक :- प्राथमीक आरोग्य केंद्र, मनसर अंर्तगत येणा-या २४ गावांमधील जनतेला आरोग्य सेवा पुरविणे तसेच कोविड- १९ अंर्तगत विवीध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवुन शाळांमधुन १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असुन ज्ञानदिप कॉन्हेंन्ट, शितलवाडी येथे ३२६ मुलांचे लसीकरण करण्यात आले.
या करिता प्रा.आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश रामटेके, डॉ. मुकेश वडमेरा, सामुदायीक आरोग्य अधिकारी डॉ. मयुर निपाने,
मनसर प्राथमिक आरोग्य केंद्र चे आरोग्य सहाय्यक प्रदीप खंते, डॉ. प्रविण चामट, अश्विनी बावणे, शिखरे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक , सेविका परिश्रम घेत आहेत…
प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरू केली असून हे विद्यार्थ्यांचा आरोग्यासाठी लाभदायक आहे. विद्यार्थ्यांना लस घेण्या साठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत असे ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट चे प्राचार्य निशांत मेंढी यांनी सांगितले.
लस घेलत्या नंतर घ्यावयाची काळजी ,म्हंजे १५ मिनिटे रेस्ट करावी , लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल घेणे ह्यावर आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत…प्रशासनाच्या सर्व नियमाचे शाळेतर्फे पुरेपूर पालन केल्या जाईल असे ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट च्या माजी प्राचार्या गीता भास्कर यांनी सांगितले…शासनाच्या आदेशान्वये आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन लसीकरण करून घेतो आहे यात ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट येथील १५ ते १८ वयोगटातील ४५० मुलांचे लसीकरण झाले आहे. विद्यार्थ्यांना आम्ही कळकळीची विनंती केली आहे की लसीकरण झाले तरी सुद्धा मास्क लावावे , स्यानीटाजर च उपयोग व सामाजिक अंतराचे पालन करणे इत्यादी सर्व सूचना आम्ही देत असल्याचे मनसर प्राथमिक आरोग्य केंद्र चे आरोग्य सहाय्यक प्रदीप खंते यांनी सांगितले.