पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचे ग्रहण, राहुरीतील बडा नेता नाराज

मुंबई :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघा एक महिना शिल्लक आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच काल भाजपकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपची ही यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपकडून राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यामुळे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे पूत्र सत्यजित कदम हे नाराज झाले आहेत.

ऐनवेळेला तिकीट कापल्याने नाराज

भाजपची पहिली यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम हे देखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळेला तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत.

दोन दिवसात निर्णय घेणार

सत्यजित कदम यांनी उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. “मी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. मी कार्यकर्त्यांमुळे नेता झालो, त्यामुळे त्यांना विचारूनच पुढचा निर्णय घेणार आहे. येत्या दोन दिवसात मी याबद्दलचा निर्णय घेईन”, असे सत्यजित कदम म्हणाले.

सत्यजित कदम यांच्यासोबतच चंद्रशेखर कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत पक्षहितासाठी थांबलो होतो, मात्र पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आता सत्यजित कदम आणि त्यांचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहणार, असे चंद्रशेखर कदम म्हणाले.

सत्यजित कदम निवडणूक लढवण्यास इच्छुक

दरम्यान २०१९ मध्ये माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यावेळी शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आले. शिवाजी कर्डीले यांचा त्यावेळी पराभव झाला होता. त्यानंतर सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय गणिते पाहता २०२४ च्या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोललं जात होतं. सत्यजित कदम यांनी मुंबईत भाजप वरिष्ठांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. पण राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पथदीप घोटाळ्याचा अहवाल शुक्रवारला येणार - गटविकास अधिकारी विजय झिंगरे

Mon Oct 21 , 2024
कोदामेंढी :- येथील ग्रामपंचायतचे सरपंच आशिष बावनकुळे यांनी पथदीप न खरीदता ग्रामपंचायत मधील सामान्य फंडातून 20/05/2024 ला गावातच निविदा धारक पुरवठा करणारे दुकान असूनही बेकायदेशीरपणे कोदामेंढीवरून वरून 75 किलोमीटर अंतरावर असणारे नागपूर येथील एम .एम. इंटरप्राईजेस या दुकानाचे बोगस बिल जोडून 3,88 ,474 रुपये काढून घोटाळा केला. याबाबत सविस्तर वृत्त मालिका मागील 10 दिवसापूर्वीपासून विविध मराठी व हिंदी दैनिकांमधून प्रकाशित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com