नागपूर :-दि. 09/10/2023 गुरूवार रोजी सोमलवार हायस्कूल खामला शाखेत ‘ दिपोत्सव ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक योगेश गोन्नाडे यांच्या संकल्पनेतून या कर्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात वर्ग 5वी ,6वी, 7वी च्या विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्सव वर्गात आनंदाने साजरा केला. वर्ग 5 च्या मुलांनी दिवाळी सणाची माहिती सांगणारे ‘ दिपोत्सव ‘ हे नाटक वर्गात सादर केले. दिवाळी उत्सवाचे महत्त्व व दिवाळीचे 5 दिवस कसे साजरे करतात याचे सादरीकरण नाटकातून करण्यात आले. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरणाचे रक्षण करा असा मोलाचा संदेश देण्यात आला. शाळेतील इयत्ता 5,6,7 च्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची सजावट केली तसेच विविध प्रकारचे आकाशकंदील, शुभेच्छापत्र, चित्रे, सुंदर दिवे तयार करून आणले व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.5,6,7 विद्यार्थ्यांनी दिवाळी गीते गायली तसेच कविता वाचन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य वर्गात सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक योगेश गोन्नाडे यांनी कार्यक्रम उत्तम झाल्याची पावती देत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी सकाळ विभागातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे सहकार्य मुलांना लाभले.
उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश सोमलवार यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.