संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- १८ वर्षा पर्यतच्या मुलींना १ लाख १हजार रूपये शिक्षण व उदरनिर्वाह करिता, १ लाख महिलांना रोजगार तसेच अंगणवाडी चे १४ हजार पद भरण्याची तरतुद या अर्थ संकल्पात करण्यात आली आहे.
तसेच सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोणातुन विविध महामंडळांकरिता अंतरिम अर्थ संकल्पात भरीव तरतुद करण्यात आली आहे. या बद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले.