नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या लोकार्पण सोहळ्याला राहणार उपस्थित
नागपूर दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले.
२७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचा लोकार्पण सोहळा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार कृपाल तुमाने, आमदार अॅड आशिष जायस्वाल, विभागीय
आयुक्त विजयलक्षमी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर-
पालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनीही त्यांचे स्वागत केले.