नागपूर :- फिर्यादी अजहर अहमद शेख, वय ४४ वर्षे, रा. वार्ड नं. १५ रजनीबाई शाळेजवळ, महादेवपुरा, वर्षा ह.मु. महीला माळा, ऑरेंजसिटी टॉवर, पत्रकार भवन रोड, धंतोली, नागपुर यांचा लॅपटॉप विक्रीचा व्यवसाय असुन, त्यांचेकडे आरोपी बादल अन्नाजी वाघ, वय २० वर्षे, रा. सरस्वती नगर, तकीया, धंतोली हा नौकर म्हणून काम करीत असे. दिनांक १७.०९.२०२३ चे ११.०० वा. ते दिनांक २८.०१.२०२४ चे १२.०० वा ने दरम्यान, पोलीस ठाणे धंतोली हद्दीतील फिर्यादीचे गोडावुन मधुन आरोपीने त्याचेकडे असलेल्या गोडावूनचे चाबीचे मदतीने गोडावुन उघडुन वेळोवेळी गोडावुन मधील असुस, डेल कंपनीचे लॅपटॉप किंमती अंदाजे ३,८०,१६८/-रु. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो ठाणे धंतोली येथे आरोपी विरुश्द कलम ३८१ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासा दरम्यान धतोली पोलीसांनी तांत्रीक तपास करून व दुकानातील इतर कर्मचान्यांना विचारपुस करून आरोपी क. १) नागेश कचरूजी वानखेडे वय २२ वर्ष रा. फकीरावाडी झोपडपट्टी, धंतोली नागपूर यास ताब्यात नेवुन विचारपूस केली असता त्याने नमुद गुन्हा त्याचे साथिदार आरोपी क. २) बादल अन्नाजी वाघ, वय २० वर्षे, रा. सरस्वती नगर, तकीया, धंतोलो, नागपूर ३) जयंतसिंग उर्फ जितू उर्फ जितेन्द्र भरतसिंग चव्हाण वय ३० वर्ष रा मुनेक चौक, गोरखपूर म.प्र यांचे सोबत केल्याचे सांगीतले. तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन गुन्हयात चोरी गेलेले ५ लॅपटॉप किमती अंदाजे २,३७,२५०/- रू ने जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि क. २), यांचे मार्गदर्शनाखाली मवपोनि श्रीमती प्रभावती एकुरके, पोठपनि अल्ललातुर शेख, नापोअ सुभाष वासाडे, बाळु जाधव, पोअ ज्ञषभ निशीतकर यांनी केली.