स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
रामटेक :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरव्दारे ख़बर मिळाली की, पोलिस ठाणे देवलापार हद्दीतून टाटा योद्धा पिकअप क्र. MH-40-BG- 9590 या वाहनात अवैधरित्या गोवंश जनावरे यांना कोंबून त्यांना नायलॉन दोरीने बांधून कतली करिता घेऊन जात आहे अशा मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हिवराबाजार येथे नाकाबंदी करून टाटा योद्धा पिकअप क्र. MH 40-BG- 9590 che वाहन चालकास धांबविण्याचा इशारा दिला असता सदर वाहन थांबवुन चेक केले असता आरोपी टाटा योद्धा पिकअप क्र. MH 40-BG 9590 चा चालक नामे- फाजील अहमद फैजल अहमद, वय २९ वर्ष, रा. लकडगंज कामठी याने आपले ताब्यातील वाहनात एकूण ११ गोवंश (गाई), बैल, कालवट, वासरू, एकुण किंमती १,४३,०००/- रु जनावरे क्रूर व निदर्यतेने वाहतुक करतांना मिळुन आले. आरोपीच्या ताब्यातून १) एकूण ११ गोवंश (गाई), बैल, कालवट, वासरू, एकुण किंमती १,४३,०००/- रुपयाचा मुद्देमाल २) टाटा योद्धा पिकअप क्र. MH 40-BG-9590 किंमती ७,००,०००/- असा एकूण ८,४३,०००/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर जप्ती मुद्देमाल व आरोपी चालक यांचे विरुद्ध कलम १९(१) ड प्राणी संरक्षण कायदा ५ (१) (1) प्राण्यास निर्दयतेने वागणूक अधिनियम सहकलम ४२९ भा. द. वी. अन्वये गुन्हा नोंद करणे कामी पो. स्टे. देवलापार यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक कर्मलवार, पोलीस हवालदार अमोल कुठे रोशन काळे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, शंकर मडावी, नितेश पिपरोदे, विपीन गायधने यांनी पार पाडली.