– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई
नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पो.स्टे. कुही परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खात्रीशीर गुप्त माहितगारांमार्फत माहिती मिळाली की, एका पिकअप योद्धा क्र. MH-३३ – T – ३३०४ या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांची चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबून कत्तलीकरीता ब्रम्हापुरी येथून नागपूर कडे वाहनात घेऊन जात आहे. अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे कुही हद्दीत मौजा ऊठी शिवारात उमरेड नागपूर हाईवे वर नाकाबंदी करून पिकअप योद्धा. MH-३३-T-३३०४ चा चालक आरोपी नामे- १) इमरानखा इस्माईलखाँ पठाण, रा. ब्रम्हपुरी २) मुलताजिम कुरेशी रा. नागपूर यांना थांबवून सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे मागील डाल्यात ०९ गोवंश किंमती अंदाजे ४५,००० /- रू. क्रूरतेने कोंबून बांधुन वाहतूक करतांना मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातून २) टाटा योध्दा वाहन क्र. MH – ३३ ३३०४ किंमती अंदाजे ४००,०००/- रु.२०९ गोवंश किंमती अंदाजे ४५,०००/- रू. ३) मोबाईल किंमती अंदाजे ४,०००/- रु. असा एकूण ४,४९०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जप्त मुद्देमाल वाहनासह पूढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन कुही यांचे ताब्यात देण्यात आले असून त्याचे विरुद्ध अप. क्र. २३१ / २३ कलम ११ (१) प्राणी संरक्षण कायदा ५ (१) व ९ प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा १८४, १३०/१७७ मोवाका सहकलम १०९ भादवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन कुही करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार अनिल म्हस्के (आय.पी.एस) पो.स्टे. कूही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, पोलीस हवालदार मयूर ढेकले, पोलीस नायक रोहन डाखोरे, पोलीस शिपाई राकेश तालेवार यांनी केलेली आहे.