संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-रा.काँ. पा. नागपूर जिल्हा (ग्रा) तर्फे नियुक्ती पत्र वाटप
कामठी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण तर्फे आज शुक्रवार गणेशपेठ नागपूर येथील पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम माजी मंत्री अनिल देशमुख तसेच सलील देशमुख यांच्या मार्गदर्शनार्थ माजी मंत्री.रमेशचंद्र बंग, राष्ट्रीय अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांच्या अध्यक्षतेखाली व रा.काँ.पा जिल्हाध्यक्ष राजु राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेऊन (कामठी शहर अध्यक्ष पदी) उदयसिंह यादव, तर कामठी तालुकाध्यक्ष पदी) विशाल गाडबैल, यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले तसेच (मौदा तालुकाध्यक्ष पदी बंडूजी वैरागडे यांना नियुक्ती पत्र देऊन सम्मानित करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने नौशाद सिद्दीकी, राजेश दुबे,संजय ढोबळ, धनराज कुबडे, निजामुद्दीन उर्फ बब्बु भाई, शेख इस्माईल मनिहार, अशोक मेश्राम,यशवंत शहाणे, पंकज चिमणकर, दिलीप हेमने, संपत गायधने, सीताराम ठाकरे, रवी निंबाते, पद्माकर बावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.