नागपूर :- दिनांक २०/०३/२०२४ रोजी पोलीस स्टेशन केळवद हद्दीत स्टॉफसह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौजा खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 वर येथे मा. पोलीस अधिक्षक, नागपुर (ग्रामीण) यांचे आदेशाने चालु असलेल्या नाकाबंदी मधील स्टाफसह मौजा खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 येथे नाकाबंदी करीत असताना दिनांक २०/०३/२०२४ चे १३/०० वाजता दरम्यान MR RAI ट्रॅव्हल्स क्र. MH-14 CW-4647 ही येतांना दिसली सदर ट्रॅव्हल्स नाकाबंदीचे ठिकाणी थांबवुन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव गणेशसिंग अमरसिंग कमोजसिंग, वय ५४ वर्ष, रा. कॅपिटल ऑफिस जवळ, छोला रोड, हुजुर भोपाल तह. जि. भोपाल (एम.पी) व ट्रॅव्हल्सचे वाहकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सुखराम सुरेश मोंगरे वय ४२ वर्ष रा. लोहारिया तह. जि. बैतुल (एम. पी) असे सांगितले व सदर ट्रॅव्हल्सचे डिक्कीची पाहणी केली असता ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत सुगंधीत तवांखु १) २०० ग्रॅमचे मजा १०८ हुक्का शिशा तंम्बाखुचे ८० डब्बे प्रत्येकी ९३५/- रू. चे प्रमाणे एकुण ७४८००/- रुपये, २) ९६ ग्रॅमचे पान पराग प्रिमियम पान मसाला वे १०० पॉकेट प्रत्येकी १२८/- रुपये प्रमाणे एकुण १२,८००/- रुपये, ३) ४०० ग्रॅमचे ईगल हुक्का- शिशा तंम्बाकु झेनचे २० पॉकेट प्रत्येकी किंमती ६४०/- रुपये प्रमाणे एकुण १२,८००/- रुपये असा एकुण किंमत – १,००,४००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर मुद्देमाल कोणाचा आहे याची चौकशी केली असता ट्रॅव्हल्स मधील प्रवासी नामे- १) कमल हसम छवारे वय ४२ वर्ष रा. इंदिरा नगर, नगरधन तह. रामटेक जि. नागपुर, २) इमरान मजिद शेख वय २८ वर्ष रा. महात्मा गांधी रोड, गांधी वार्ड, भंडारा जि. भंडारा यांचा माल असल्याचे निश्पन्न झाल्याने सदर सुगंधीत तबांखु हा महाराष्ट्र राज्यात वाहतुक व विक्री करण्यास प्रतीबंध असल्याने सदर ट्रॅव्हल्स मध्ये असलेला सुगंधीत तंबाखु अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नागपूर विभाग नागपूर यांना माहीती देवुन त्यांच्या मार्फत पुढील कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस अंमलदार धोंडूतत्या देवकाते, पोलीस हवालदार दिनेश काकडे, पोलीस नायक दिपक इंगळे, चालक सहायक फौजदार गुणेश्वर डाखोले यांनी पार पाडली.