नागपूर :- नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणूकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षकांची ( counting observer) नियुक्ती करण्यात आली आहे.
फैयाज अहमद मुमताज हे उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 8263895421 असा आहे. महेश कुमार दास हे काटोल, सावनेर आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 7782959597 असा आहे.
विपुल बंसल हे नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण व नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा मोबाईल क्रमांक 9356053085 असा आहे. तर राजीव रंजन सिन्हा हे नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर (अ.जा.) या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असतील. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9931604077 असा आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था अनुक्रमे कॉटेज क्रमांक 9,2,6 आणि 8 रवी भवन नागपूर येथे करण्यात आलेली आहे. मतमोजणी बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवाराची, नागरिकांची किंवा मतदारांची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केले आहे.