· पशु पालकांनी गुरांना लस द्यावी
· पशु संवर्धन विभागाचे आवाहन
भंडारा :- पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हयात लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.तसेच मागील वर्षी लम्पी चर्मरोगाने संपूर्ण देशात व राज्यात जनावरे बाधीत झाली होती.व त्या आजाराने जनावरांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे औषधोपचारापेक्षा प्रतिकार बरा हा ध्यास ठेवून लम्पी चर्म रोग प्रतिबंधक GOAT Pox Vaccine उपलब्ध झालेली आहे.
जिल्ह्यात लसीकरण जोमाने सुरु आहे.सोबतच घटसर्प,ब्रूसेला, थायलेरीया हया गाय व म्हैश वर्गीय जनावरांचे लस उपलब्ध असून याचे सुध्दा लसीकरण सुरु करण्यात आले आहे.ज्या पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण केले नसेल त्यांनी आपल्या परीसरातील पशु दवाखान्यात संपर्क साधावा,व वेळीच रोगावर प्रतिबंध करावा,असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.