वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुणाई’ विषयावर झाली स्पर्धा

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी वक्तृत्व स्पर्धा पार पडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुणाई’ या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व विदर्भ युथ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये ११ पेक्षा अधिक शाळा तसेच ३२ महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाला बोलण्याकरिता ४ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. अशा प्रकारे ही स्पर्धा सतत ८ तास सुरू होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तरानुसार ३ गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. अ गटात ५ वी ते १२ वी पर्यंतचे व आयटीआय मधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ब गटात पदवीधर विद्यार्थी तर क गटात पदव्युत्तर पदवी, पीएचडी आणि सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग होता. स्वराज्य आणि समकालीन लोकशाही, छत्रपतींचे नेतृत्व, छत्रपतींचे तत्व (गुणवत्ता) आणि छत्रपतींचे शेतकऱ्यांसाठी योगदान असे ४ विषय वक्तृत्व स्पर्धे करिता देण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाचे आंतर विद्याशाखीय विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, भारतीय सेना मराठा रेजिमेंटचे देविदास लाखे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला सई थोटे, अंशुल पटले, दिनेश धोटे यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती. लतादेवी लाखे, विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी अ गट, डॉ. दत्ता शेरके आणि डॉ. पुष्पक लोहितकर यांनी ब गट, डॉ. अनिलकुमार मानकर यांनी उर्वरित गटातील स्पर्धकांचे परीक्षण केले. मराठी संस्कृतीला अनुसरून पार्थ मासे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संमेलनात आमंत्रित करण्यासाठी शिवगर्जना गायली. सृष्टी बोरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व स्पर्धेची नियमावली उपस्थितांना सांगितली.

देविदास लाखे आणि डॉ. प्रशांत कडू यांच्या भाषणानंतर स्पर्धेची पहिली फेरी सुरू झाली. 11 विविध शाळांमधील 18 विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत किशोरवयीन मुलांनी भावस्पर्शी मत व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत ३० विविध महाविद्यालयातील सुमारे ५० स्पर्धकांनी आपले विचार मांडले. त्यानंतर तिसर्‍या फेरीस सुरुवात झाली. ज्यात विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेच्या शेवटी परीक्षकांनी निकाल घोषित केला.

त्यानंतर समारोपीय भागामध्ये सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ३ गटातील ३ स्पर्धकांना प्रत्येकी २ हजार रुपये, त्याचप्रमाणे सर्व द्वितीय क्रमांकासाठी १५०० आणि प्रत्येक उपविजेत्याला १००० असे पुरस्कार देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे  प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, मुख्याध्यापक हेमंत आवारे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ.संजय दुधे यांच्या भाषणाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. कार्यक्रमाला जल जीवन मिशन इंटर्नशिप आणि G20-C20 समिट नागपूरचे काही विद्यार्थीही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रुती बोरकर, सई थोटे, अंशुल पटले, निखिल पात्रीकर, हिमांशु महाजन, आर्यन ठाकरे, श्रुती बोधनकर, सोमनाथ लोंडे आणि आयओएसच्या पथकाने सहकार्य केले.

NewsToday24x7

Next Post

सोमलवार हायस्कूल, खामला शाळेत 'दिपोत्सव'कार्यक्रम

Sat Nov 11 , 2023
नागपूर :-दि. 09/10/2023 गुरूवार रोजी सोमलवार हायस्कूल खामला शाखेत ‘ दिपोत्सव ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक योगेश गोन्नाडे यांच्या संकल्पनेतून या कर्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात वर्ग 5वी ,6वी, 7वी च्या विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्सव वर्गात आनंदाने साजरा केला. वर्ग 5 च्या मुलांनी दिवाळी सणाची माहिती सांगणारे ‘ दिपोत्सव ‘ हे नाटक वर्गात सादर केले. दिवाळी उत्सवाचे महत्त्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com