नागपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियातंर्गत घनकचरा व्यवस्थापन व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मंजूर उर्वरित सर्व कामे 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना विभागीय सह आयुक्त संघमित्रा ढोके यांनी यावेळी संबंधितांनी दिल्या.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक समीर उन्हाळे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे मुख्य अभियंता प्रशांत जनबंधु, विभागीय तांत्रिक तज्ञ अभिलाष अलोणी, मीनाक्षी बागडे, अभिषेक रेवतकर आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिकांचा वर्ष 2017 मधे मंजूर निधीतुन प्रस्तावित कामाची माहिती घेण्यात आली. या निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाबाबत प्रशासकीय अडचणीं व उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मंजूर निधीतुन करण्यात येणारी प्रस्तावित वाढीव कामे, नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या कामासंबंधीची, तांत्रिक मंजूरी मिळविण्यासाठी प्रस्तावाबाबत माहिती, विविध साहीत्य, कचरा संकलनासाठी घंटागाडी, मशीनरी, बायोगॅस प्रकल्प व बायोमाईनिंगच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतांना घेतांना नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिकांना कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.