संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात रिफ्रेशर कोर्सचे उद्घाटन

शिक्षकांनी विद्याथ्याशी संवाद साधावा – कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे

अमरावती :- शिक्षकांनी एकमेकांशी तसेच विद्याथ्याशी संवाद साधावा, जेणेकरुन त्यांना संधी मिळेल असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात नुकतेच ‘थेअरी, रिसर्च अँड इनोव्हेशन इन केमिकल एज्यूकेशन’ या शिर्षकावर रसायनशास्त्र विषयाच्या रिफ्रेशर कोर्सचे उद्घाटन आभासी पध्दतीने करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदव्युत्तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र प्रसाद, प्रमुख अतिथी म्हणून अॅश स्टिव्हन्स, युनायटेड स्टेट चे डॉ. नासिर बेग उपस्थित होते.

डॉ. नासिर बेग म्हणाले की, रसायनशास्त्राच्या शिक्षकांनी आपले ज्ञान अधिक अद्ययावत केले पाहिजे, जेणेकरुन विद्याथ्र्यांमध्ये या विषयाबद्दल रस निर्माण होऊ शकेल. सायन्स, डिस्क्व्हरी अँड मोटीव्ह या विषयावर डॉ. बेग यांनी विस्तृत विवेचन केले.

इन्स्टिटूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, मराठवाडा कॅम्पस जालना येथील शास्त्रज्ञ डॉ. मनोज गावंडे यांनी दि राईज ऑफ नॅनोमटेरियल्स अँड इट्स सस्टेनेबल अॅप्लीकेशन या विषयावर मार्गदर्शन केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजेश भोयर यांनी तंत्रज्ञानाची शिक्षणाशी कशी सांगड घालावी यावर भर देत तंत्रज्ञनाचा नवनवीन प्रकारे कसा वापर करावा, याविषयी विद्याथ्र्यांना माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणातून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जगभरात सुरु असलेल्या संशोधनाविषयी माहिती दिली. विद्याथ्र्यांच्या मनात रसायनशास्त्राविषयी कशी आवड निर्माण करावी याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

देशभरातील शिक्षकांचा सहभाग

युजीसी – ह्रुमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर, सत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या या दोन आठवड्याच्या रिफ्रेशर कोर्समध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा. यवतमाळ, वाशिम, नागपूर, गोदिया, चंद्रपूर, गडचिरोली, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी यासह अनेक जिल्ह्रांमधील 40 शिक्षक, तसेच जम्मू -काश्मीरमधील पुलवामा, रायगड, रायपूर, चेन्नई, उत्तराखंडमधील पौरी, केरळमधील कन्नूर येथील शिक्षक सहभागी झाले. त्याचबरोबर इन्स्टिटुट ऑफ सायन्स, मुंबई, इन्स्टिटुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, मराठवाडा कॅम्पस, अॅश स्टिव्हन्स, अमेरिका, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील रसायनशास्त्र, भौतिक विज्ञान, संगणक विज्ञान, माहिती आणि ग्रंथालय विज्ञान या विषयाचे नामांकित शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांच्याही व्याख्यानाचा यात समावेश आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com