जलतरणपटूंना आंतराष्ट्रीय दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी कामठी शहरातच उपलब्ध

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्याचे नावलौकिक म्हणून प्राप्त असलेल्या कामठी शहराला फुटबॉल ची नर्सरी म्हणूनही संबोधले जाते.या शहरातून मोठमोठे नामवंत खेळाडू उदयास आले असून क्रीडानगरी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या या कामठी शहरातील खेळाडूंना जलतरण क्रीडा क्षेत्रातील जलतरण पटूंना आंतरराष्ट्रीय दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी ही कामठी शहरातील अनुराग जलतरण तलाव संकुलात मिळत असल्याने मोठ्या संख्येतील नागरिकांचा जलतरण क्षेत्राकडे कल वाढलेला आहे.

जलतरंणपटूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करण्यासाठी व योग्य सुविधेसाठी दर्जेदार प्रशिक्षणाची गरज असते .या दर्जेदार प्रशिक्षनांसाठी मोठ्या शहरात धाव न घेता कामठी शहरातूनच दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे तसेच परिस्थितीअभावी कुण्या जलतरंनपटूचा खेळ न थांबता जलतरण पटूची परवड थांबावी या मुख्य उद्देशाने 4 मे 2007 ला कामठी शहरात अनुराग जलतरण तलाव संकुलाचे उदघाटन करण्यात आले होते.या जलतरण तलाव संकुलात प्रशिक्षण देणारे राष्ट्रीय प्रशिक्षक आनंद भोसले यांच्या प्रशिक्षणातून बरेच जलतरणपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास आले असून येथील जलतरण पटू विद्यार्थ्यांनी उंच भरारी सुदधा घेतले आहेत.

याच अनुराग जलतरण तलाव संकुलात प्रशिक्षण घेतलेले जलतरणपटू दहा वर्षाचा इशांत भूषण चवरे याने राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत रौप्य पदक मिळविले आहे तसेच प्राजक्ता खंगनला सुवर्णपदक प्राप्त झाले आहेत यासारखे बरेच जलतरणपटू या अनुराग जलतरण तलाव संकुलातुन प्रशिक्षण घेऊन उदयास आले आहेत.येथील राष्ट्रीय प्रशिक्षक आनंद भोसले हे जलतरण प्रशिक्षणासह शिस्त आणि अनुशासनासह व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण सुदधा देत असल्याने यासारखे जलतरणपटू निर्माण होण्याची सुवर्णसंधी येथील जलतरण प्रशिक्षणार्थ्यांना मिळत आहे.

जलतरण हा ऑलम्पिकमधील पाच मूळ खेळांपैकी एक आहे.सन 1896 मध्ये त्याची सुरुवात झाल्यापासून जलतरण हा खेळ त्याचाच एक भाग आहे.या प्रकारातील आंतरराष्ट्रीय तसेच ऑलम्पिक दर्जाचे खेळाडूं निर्माण व्हावे त यासाठी प्रशिक्षक आनंद भोसले त्यादृष्टीने प्रशिक्षण देत आहेत.या जलतरण प्रशिक्षनामुळे कामठी शहरातील जलतरंणपटूंना नक्कीच लाभ होत असल्याचे जलतरण प्रशिक्षणार्थ्यांनी बोलून दाखविले आहे.

या अनुराग जलतरण तलाव क्रीडा संकुलात प्रशिक्षक आनंद भोसले सह अजय राघोर्ते हे सुदधा प्रशिक्षक म्हणून मोलाची भूमिका साकारत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Thu May 18 , 2023
नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक १७/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे इमामबाडा, गणेशपेठ, धंतोली नागपुर शहर आणि पुलगांव जिल्हा वर्धा चे हददीत शरीराविरूद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अधिकेष वल्द सुरेंद्र वानखेडे वय १९ वर्ष रा. रामबाग, अशोका बौध्द विहार मागे, पो.स्टे. इमामबाडा, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com