मानांकीत इशानला बिगरमानांकीत राहुलचा धक्का, खासदार क्रीडा महोत्सव : कॅरम स्पर्धा

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेमध्ये पाचवा मानांकीत इशान साखरेला बिगरमानांकीत राहुल वर्माने पराभवाचा धक्का देत स्पर्धेत आघाडी घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे स्पर्धा सुरू आहे.

गुरूवारी (ता.25) झालेल्या पुरूष एकेरी सामन्यात पाचवा मानांकीत इशान साखरेचा बिगरमानांकीत राहुल वर्माने 19-16, 16-16, 25-1 असा पराभव करीत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रौढांच्या सामन्यांमध्ये संदीप गजीमवार, दिनेश बागडे, निशिकांत मेश्राम आणि इम्तियाज अहमद यांनी तर महिलांमध्ये अंजली प्रजापती, डिम्पल पराते, दिप्ती निशाद आणि पुष्पलता हेडाउ यांनी प्रतिस्पर्धकांना नमवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.

प्रौढांच्या एकेरीमध्ये संदीप गजीमवारने अकोल्याच्या एजाज मिर्झाचा 21-16, 25-9 ने, दिनेश बागडेने रवी बढेलचा 25-2, 25-4 ने, निशिकांत मेश्रामने अकोल्याच्या अनिश बाबाचा 20-10, 25-0 ने आणि इम्तियाज अहमदने केवल मेश्रामचा 25-16, 25-7 ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.

महिलांमध्ये अंजली प्रजापतीने माधवी निशादला 22-4, 19-1 ने, डिम्पल परातेने साक्षी कछवेला 24-0, 5-24, 20-7 ने, दिप्ती निशादने रामटेकच्या वनिष्का गुप्ताला 25-10, 25-0 ने आणि पुष्पलता हेडाउने पौर्णिमा पराळेला 25-16, 15-05 ने नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

निकाल (एकेरी)

प्रौढ गट

संदीप गजीमवार (जनता) मात एजाज मिर्झा (अकोला) 21-16, 25-9

दिनेश बागडे (जेबीकेएम) रवी बढेल (नवयुवक) 25-2, 25-4

निशिकांत मेश्राम (एनकेएम) अनिश बाबा (अकोला) 20-10, 25-0

इम्तियाज अहमद (पटेल क्लब) केवल मेश्राम (एनकेएम) 25-16, 25-7

महिला एकेरी

अंजली प्रजापती (राय) माधवी निशाद (राय) 22-4, 19-1

डिम्पल पराते (राय) साक्षी कछवे (ओम) 24-0, 5-24, 20-7

दिप्ती निशाद (राय) वनिष्का गुप्ता (पीजीव्ही रामटेक) 25-10, 25-0

पुष्पलता हेडाउ (जनता) पौर्णिमा पराळे (राय) 25-16, 15-05

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य रॅली

Fri Jan 26 , 2024
नागपूर :- राष्ट्रीय मतदार दिवसाचे अनुषंगाने आज सकाळी वसंतराव नाईक शासकीय विद्यालय येथून स्विप अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, राजीव स्पोर्टस् फाऊंडेशन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सुमारे 700 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंस्पूर्त सहभाग नोंदविला. ही रॅली वसंतराव नाईक कॉलेज येथून सुरु करण्यात आली पुढे झिरो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com