नागपूर :- काटोल मार्गावर झालेल्या अपघातात मृत पावलेल्या तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आणि पसार झालेल्या दोन वाहन चालकांना काही तासातच अटक करून कार्यतत्परतेचा परिचय देणारे अंबाझरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनायक नामदेव गोल्हे यांचा महिला कट्टाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.‘फास्टेस्ट फास्ट’ या उपक्रमांतर्गत हा सत्कार करण्यात येणार असून सर्व अधिकाऱ्यांना यामुळे प्रेरणा मिळावी, हा यामागील उद्देश आहे. अ. भा. हिंदी संस्था संघ आणि महाराष्ट्र राष्ट्रसेवा सभा (विदर्भ विभाग) यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमाला महिला कट्टा सदस्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महिला कट्टा संयोजिका प्रगती पाटील यांनी केले आहे