गादा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील गादा येथे रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा जयंतीचे निमित्त साधून गावातील होतकरू सामजिक कार्यकर्ते व हरीश ट्युशन क्लासेसचे संचालक हरीश रोहनकर यांच्या माध्यमातून गावातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी गावातील नवीन पोलीस पाटील वंदना चकोले, प्रफुल्ल गुरव आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार कवी लीलाधर दवंडे व सामजिक कार्यकर्ते घनश्याम चकोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. वरील सर्वांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मोलाचे मार्गदर्शन केले तर विद्यार्थीनींनी नृत्य व गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्वागत गीत मृणाल वाट हिने म्हटले तर घनश्याम चकोले यांनी श्री गणेश स्तुती सादर केली.

गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच विशेष म्हणजे सृष्टी बावणे, माही देशमुख आदी विद्यार्थ्यांनींनी स्वतःचे सुंदर मनोगत सुद्धा यावेळी व्यक्त केले. आभार प्रदर्शन महेक बागडे या विद्यार्थिनीने केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल खुरपडी, जयेश खुरपडी, भारती रोहनकर यांनी मोलाचे योगदान दिले.

NewsToday24x7

Next Post

विद्दूत धक्क्याने तरुणाचा मृत्यु

Mon Sep 18 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आशा हॉस्पिटल मागील ग्रीन टाऊन सोसायटी येथे अर्चना संजय लिंगलवार यांच्या घरी पीओपी चे काम करीत असलेल्या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडे चार वाजता घडली असून मृतक तरुणाचे नाव मोहम्मद अजगर अली वय 35 वर्षे रा बलरामपूर उत्तरप्रदेश असे आहे. पोलिसांनी यासंदर्भात […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com