संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी १९ मे – नगर परिषद कामठी अंतर्गत येणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने सफाई करण्यासंदर्भात भाजप कामठी शहरच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले शहरातील अंतर्गत भागातून बाघडोरा नाला,बैलबाजार ते कोळसा टाल नाला तसेच पोरवाल महाविद्यालय गेट ते डम्पिंग यार्ड पर्यंत नाला गेला असून त्यात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला आहे तसेच नाल्याच्या शेजारी असलेल्या घरमालकांनी यात गडर चे पाणी सोडले असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे पावसाळ्यात दोन्ही नाले पाण्याने तुडुंब भरून नाल्यात कचरा जमा असल्याने पाणी निघण्यासाठी पुरेशी जागा राहत नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरात घुसण्याचा प्रकार अनेकदा घडले आहे यात प्रामुख्याने रमा नगर,कामगार नगर, आनंद नगर,रामगढ, गौतम नगर छावणी, इस्माईल पूरा पिली हवेली, भाजी मंडी नागसेन नगर परिसरातील नागरिकांना दरवर्षी नाहक त्रास सहन करावा लागतो वरील समस्यांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पूर्वनियोजन म्हणून प्रशासनाने शहरातील सर्व लहान मोठ्या नाल्यांचे सर्वेक्षण करून नालेसफाई कामाला प्राधान्य द्यावे अशा आशयाचे निवेदन भाजप कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया,कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल,भाजप कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले,सुनील खानवानी, राज हाडोती, विरोधी पक्ष नेते लालसिंग यादव,अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष विकी बोंबले,भाजप कामठी शहर उपाध्यक्ष जितेंद्र खोब्रागडे यांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे प्रशासक श्याम मदनुरकर,मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या अनुपस्थितीमध्ये उपमुख्य अधिकारी नितीन चव्हाण यांना आज गुरुवारी दुपारी सादर केले यावेळी नगर परिषद चे आरोग्य व स्वच्छता अधिकारी विरेंद्र ढोके उपस्थित होते