मतदार ओळखपत्र नाही अशा मतदारासाठी पर्यायी कागदपत्र ग्राह्य  – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर : छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षीत करण्यात याव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे व पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

आगामी विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.

पर्यायी कागदपत्रात आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदारांना व आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत. त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र विद्यापीठाद्वारा वितरीत मूळ पदवी व पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) चा समावेश आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Yeh “Bajirao” Kaun hai…!

Fri Jan 20 , 2023
Mumbai – This name comes to mine and most of the bureaucrats mind, as the man Friday of a very powerful man and his Private Secretary, of our state. Today this man is seen hobnobbing within the top IAS cadre, trying to be another Avinash Bhosale, claims to be close to the power centre, obviously after Ajay Ashar and Sachin […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com