समाजातील सर्व घटकांनी योग दिन कार्यक्रमात सहभागी व्हावे – अजय चारठाणकर

– सामूहिक योगासन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा 

नागपूर :- जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे जनतेला आवाहन करीत अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी प्रशासनाने समाजातील सर्व घटक सहभागी व्हावेत यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग्य दिनाचा कार्यक्रम शुक्रवार २१ जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे सकाळी ६ वाजता करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.१९) मनपा मुख्यालयात कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी घेतला.

जागतिक योग्य दिनाची थीम यंदा “योग फॉर सेल्फ अँड सोसायटी” (Yoga for Self and Society) आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजातील सर्व घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन चारठाणकर यांनी केले. त्यांनी तृतीयपंथी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, बचत गट यांच्यासह एनसीसी, एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या अभियानात शामिल होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर शहराचे आणि जिल्ह्यातले सर्व आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळचे प्रमुख रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

मनपातर्फे यशवंत स्टेडियम येथे मोठ्या आकाराचे स्टेज तयार करण्यात येत आहे. योगाभ्यास करण्यासाठी नागरिकांनी स्वतः दरीची व्यवस्था करावी. तसेच पाण्यासाठी स्टीलची बॉटल वापरावी. योग दिवस कार्यक्रम हा शून्य कचरा अर्थात “झीरो वेस्ट इव्हेंट” वर आधारित राहणार आहे. योगाभ्यासा करीता यशवंत स्टेडियमवर पोहचण्यासाठी बसेसची सुविधा राहणार आहे. नागरिकांनी मनपाच्या बसेसचा वापर करावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

आढावा बैठकीत उपायुक्त घनकचरा व्यस्थापन विभाग डॉ. गजेंद्र महल्ले, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता वाईकर, समाज विकास विभाग, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग आणि इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मॉ काली मंदीरात पुजा अर्चना करून शिवसेना वर्धापन दिन होते साजरा

Thu Jun 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- हिंदु हुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हयानी स्थापन केलेल्या प्रखर शिवसेना चा ५८ वा वर्धापन दिन सोहळा जय मॉ काली मंदीर सत्रापुर कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आहे. बुधवार (दि.१९) जुन ला हिंदु हुदय सम्राट स्व. मा. बाळासाहेब ठाकरे हयानी मराठी माणुस व प्रखर हिंदुत्वाची अस्मिता जपन्याकरिता १९ जुन १९६६ ला मुंबई येथे शिवसेनाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com