कन्हान :- श्री हनुमान व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर बखारी येथे अखंड हरिनाम संकीर्तन काकड आरती सप्ताहाची सुरूवात करून दररोज पहाटे काकडा, गाथा भजन, पारायण, हरिपाठ, हरि किर्तन आणि हरि जागर करून बुधवार (दि. २७) नोहेंबर ला पालखी, दिंडी गाव भम्रण करून दुपारी मंदीरात गोपाल काल्या चे किर्तनांतर महाप्रसाद वितरण करून थाटात सांगता करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर कमेटी बखारी व्दारे काकड आरती निमित्त अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह सोहळयाची बुधवार (दि.२०) नोहेंबर २०२४ ला सुरूवात करण्यात आली. दररोज पहाटे सकाळी ५ ते ६ वाजता काकडा, १० ते १२ वा. गाथा भजन पारायण, सायंकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ, रात्री ८ ते ११ वा. हरिकिर्तना नंतर हरि जागर करण्यात आला. या सात दिवसात बखारी व परिसरातील भाविक भक्तांनी हरिनामाचा मनसोक्त आनंद लुटुन भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रमा चा लाभ घेतला.
बुधवार (दि.२७) ला सकाळी ८ वाज ता पालखी, दिंडी व मिरवणुक काढुन गाव भम्रण करि त मुख्य चौकात महिला पुरूषानी वारकरी भजनाच्या तालावर सुंदर फुगडया खेळुन भक्ती रसत न्हाहुन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. गाव भम्रणानंतर मंदीरात दुपारी १२ वाजता पासुन ह.भ.प. विनोदाचार्य श्री पांडुरंगजी महाराज मुरुमकर बनगाव ता.जि. पांढुर्णा (म.प्र.) यांचे गोपाल काल्याचे कीर्तन करून दहीहंडी फोडुन ३ वाजता पासुन महाप्रसाद वितरण करून अखंड हरिनाम संकीर्तन काकड आरती सप्ताहाची थाटात सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वि तेकरिता श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर कमेटी चे संजय पांडे, वासुदेव सहारे, भगवान कडु, दत्तु धुडस, नरेश ढोणे, उपसरपंच राहुल पांडे, हर्षल धुडस, दिपक आमले, रविंद्र चौधरी, हिमांशु ठाकरे, रामदास बावने, योगेश कडु, राहुल धुडस, सौरभ कडु, श्रीराम पांडे, पाडुरंग गावंडे, पुडंलिक आमले, नरेश गावंडे, भुषण चौधरी, तुषार गावंडे, अविनाश सहारे, एकनाथ गावंडे, प्रविण गडेकार, आर्यन ठाकरे, महेश बाझनघाटे, रंगराव राऊत, प्रज्वल पांडे, सुधाकर राऊत, रौनक वासाडे, रामकृष्ण राऊत, आदित्य सोनशेंद्रे, महेश सहारे, ईश्वर बांगडे, लिलाधर ठाकरे, सुरेंद्र पांडे, वासुदेव ठाकरे, वसंता पांडे, अशोक ठाकरे, सुनिल पांडे,
सरपंचा शोभा ढोणे, संगिता सहारे, माधुरी वासाडे, शोभा आमले, मंगला पांडे, बेबीबाई आमले, इंदिरा गावंडे, प्राजक्ता पांडे, ज्योती गावंडे, जिजा धुडस, माधुरी गडेकर, सुनिता कडु, वंदना गावंडे, ममता कडु, राजुष चौधरी, प्रभा केळकर, छाया ठाकरे, आरती भिमटे, तुळशा वासाडे, रोशनी चौधरी, ललिता वासाडे, गीता फुटाणे, मंदा पांडे, मंदा वासाडे, माया पांडे, छबुबाई गोडाळे सह समस्थ गावकरी मंडळी बखारी हयानी परिश्रम घेतले.