ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक पडद्याआड  – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समाजात एकता, बंधुता, शांतता, सामाजिक सलोखा रहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. ‘सुवार्ता’ साप्ताहिकाच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी तळमळीने केलेले काम सदैव लक्षात राहील. त्यांच्या निधनाने पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याचं स्मरण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आपत्ती नियंत्रण कक्षातून आढावा

Thu Jul 25 , 2024
– महापालिका आयुक्त विभागीय आयुक्तांची दूरध्वनीवरून चर्चा – बचाव आणि मदतकार्यासाठी राज्य प्रशासन आणि राज्य आपत्ती निवारण यंत्रणेनी सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com