ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या अथक प्रयत्नाला, यश रमा नगर रेल्वे फाटक मार्ग वाहतुकीस सुरळीत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनी भाविकगण कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देण्यास येणार आहेत. परंतु मागील तीन वर्षांपासून सुरू असलेला रमानगर रेल्वे ओवर ब्रिजचे बांधकाम हे कासवगतीने सुरू असून रखडलेल्या बांधकाम स्थितीत या मार्गाहून वाहणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला पोहोचनारा मार्ग सोयीचा ठरत नसल्याने सदर रखडलेल्या बांधकामाला गती प्राप्त देत वाहतुकीस सुरळीत सदृश्य रस्ता बांधकाम करावे, जेणे करून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येणाऱ्या भाविकांना सोयीचे होईल अशी मागणी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरीला केली होती. या मागणीची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे ऍड सुलेखा  कुंभारे यांच्या अथक प्रयत्नाला प्राप्त झालेल्या यशामुळे रमानगर रेल्वे फाटक च्या रखडलेल्या बांधकामाला गती आली व सदर रस्ता अखेर आजपासून मोकळा झाला असून या मार्गातून दुचाकी, चारचाकी वाहने धावू लागले. यामुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला जाणे सोयीचे झाल्याने येथील नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून येथील नागरिकांच्या वतीने ऍड सुलेखा कुंभारे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहे.

उल्लेखनीय आहे की मागील कित्येक दिवसापासून रखडलेल्या रमानगर रेल्वे पूल बांधकामाला गती देत वाहतुकीयोग्य रस्ता सुरळीत करावा अशी मागणी ऍड सुलेखा कुंभारे यांनी केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी कडे केली असता ना नितीन गडकरी यांनी सदर मार्ग त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिल्यावरून ऍड सुलेखा कुंभारे यांच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार विजयवर्गीय यांनी कामाला गती दिली ज्यामुळे सदर रस्ता ये जा करण्यासाठी सुरळीत होत, बंद असलेल्या वाहतूकीचा मार्ग मोकळा झाला. यामुळे शहरात सुलेखा कुंभारे यांचे नागरिकातर्फे आभार मानण्यात येत असून ‘ताई है तो सब मुनकीन है’चा सूर वाहत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी

Mon Oct 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.यांची पुण्यतिथी तर डॉ ए पी जे कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक वंजारी होते. प्रमुख अतिथी जेष्ठ प्राध्यापक मेंढे मंचावर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. विश्वनाथ वंजारी यांनी संतांच्या विचारातील राष्ट्रनिर्माणाची भावना विश्वधर्माच्या पुस्तकाचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com