कर्मवीर दादासाहेबांचे शिकवण, विचार आणि चळवळीचा वारसा ऍड सुलेखाताई पुढे घेऊन जात आहेत-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-भारत जपान चे मैत्रीसंबंध निर्माण करण्यात सुलेखाताईचे दायित्व-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कामठी ता प्र 22 :- माजी सांसद सदस्य व बिडी कामगारांचे हृदयसम्राट कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांनी समाजाच्या सर्व आघाड्यावर प्रमुख भूमिका वठवून आपल्या बहुगुणी नेतृत्वाने समाजाच्या विकासासाठी त्यांनी उभारलेले कष्ट हे अविस्मरणीय आहेत अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी ऍड दादासाहेब कुंभारे यांची शिकवण आणि विचार आणि चळवळीचा वारसा ऍड सुलेखाताई कुंभारे पुढे घेऊन जात असल्याचे मौलिक प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात स्थित कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाचे अनावरण तसेच ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनचे भूमीपूजन ,पर्यटक यात्री निवास तसेच आंतररराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृहाचे भूमिपूजन करतेवेळी व्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मवीर दादासाहेबांचे बिडी कामगारांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव संघर्षीत जीवनशैली राहली ती फक्त परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित झाल्यामुळे असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी सोहळ्याला व्यसपीठावर प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल,रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांनी समयोचित असे विचार व्यक्त केले.याप्रसंगी पीआरपीचे संस्थापक प्रा जोगेंद्र कवाडे,भदंत राहुल बोधी,माजी आमदार प्रकाश गजभिये ,आर्किटेकट बी टी मसे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

आज 22 मार्च ला कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांच्या हस्ते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या हस्ते शिल्पाचे अनावरण करण्यात आले तसेच ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन ,पर्यटक यात्री निवास आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृहाचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते रिमोट ने भूमीपूजन करण्यात आले तसेच कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनपटावर आधारित डाक्युमेंट्री चे प्रस्तुतिक्ररण करण्यात आले.

केंद्रिय परिवहन मंत्री  नितीन गडकरी पुढे म्हणाले की समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांना न्याय देण्याहेतु मानवतेच्या आधारावर समाजाची जडणघडण झालीच पाहिजे ,सर्वसामान्य माणसाचा सामाजिक शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यावर पुढाऱ्यांनी भर द्यायलाच पाहिजे तेव्हाच आपली कर्तव्यदक्ष भूमिका साकारली असे सार्थक होते.कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे हे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक लढ्यातील अत्यंत निष्ठावंत ,निर्भीड,निश्चयी नि:स्पृह व थोर संघर्षशील लोकनेते म्हणून ख्यातकीर्त आहेत.’बिडी मजदूर चळवळ व ‘आंबेडकरी चळवळ’ या दोन्ही आंदोलनातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वस्वी त्याग करून दलित,शोषित ,वंचीत तसेच मजूर -कामगारांना त्यांचे कायदेशिर हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला.कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे एक कुशल संघटक ,उत्कृष्ट संसदपटू ,मजुराचे सजग कल्यांणमित्र,अजातशत्रू,सत्यानवेशी लेखक,साक्षेपी विचारवंत,युगद्रष्टे कवी व बिडी कामगारांचे हृदयसम्राट होते.लढवय्या लोकनेता म्हणून त्यांचे सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,धार्मिक व राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे.याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी आपले जीवन समर्पित केल्यावरून केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी यांनी सुलेखाताईचे कौतुक केले.

तर माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिप्रेत असा समाज निर्माण करण्यासाठी कर्मविर ऍड दादासाहेब कुंभारे विविध चळवळीच्या स्वरूपातून झटत राहले मात्र वयाच्या 59 व्या वर्षी दादासाहेबांचे अकस्मात निधन झाल्याने त्यांच्या संघर्षमय चळवळीला पुढे नेण्यासाठी आपले जीवन समर्पित करून मागील 42 वर्षांपासून कार्यरत असल्याचे मौलिक मत व्यक्त केले.

आजच्या या कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी सोहळ्याला मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती .कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून दरम्यान ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते विविध समाजसेवी संस्थांना सम्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओगावा सोसायटी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था ,हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ओगावा इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड, जयभारत कामगार सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य बिडी उत्पादक मजदूर संघ,दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक मजदूर सहकारी संस्था,बहुजन रिपब्लिकन एकता मंच ,निर्धार महिला व बालविकास समिती यासह संस्थेचा सक्रिय सहभाग राहला.

आज 23 मार्च ला सायंकाळी 4 वाजता ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीर’स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.

23 मार्च रोजी कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 23 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारीत ‘कर्मवीर’स्मरणिकेचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते ,सिनेदिग्दर्शक -निर्माता नागराज मंजुळे यांच्या शुभ हस्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.याप्रसंगी शैक्षणिक,सामाजिक ,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 100 समाजसेवी संस्थांना संमानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी खासदार व पीआरपी चे संस्थापक -अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे ,रिपाईचे महासचिव व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य राजेंद्र गवई व रिपाई(खो)यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.तत्पूर्वी 23 मार्च 2023 रोजी सकाळी साडे दहा वाजता पूज्य भिख्खू संघाच्या उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना होणार आहे .याप्रसंगी बौद्ध धम्म उपासिका  नलिनीताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते उपस्थित पूज्य भीक्खु संघाला चिवरदान ,भोजनदान व संघदान देण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोककल्याणकारी प्रकल्पांद्वारे कर्मवीर दादासाहेबांची जन्मशताब्दी साजरी व्हावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Mar 23 , 2023
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वसामान्य जनता आणि बिडी कामगारांसाठी संघर्ष उभारुन अधिकार मिळवून दिले. दादासाहेबांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे यासाठी विविध लोककल्याणकारी प्रकल्प उभारुन त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे व्हावे, अशा भावना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केल्या.            […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com